गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑगस्ट 2017 (14:14 IST)

SET च्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दुरूस्त करून ४५ दिवसात निकाल जाहीर होईल

SET(स्टेट एलिजिबलिची टेस्ट) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दुरूस्त करून मिळाव्यात या मागणीसाठी दोन दिवसांपासून पुणे विद्यापीठातील विद्यार्थी उपोषणाला बसले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांच्या मागण्या आज कुलगुरूंसमोर मांडल्या. कुलगुरुंनी त्या मान्य केल्या. कुलगुरुंनी लेखी स्वरूपात ४५ दिवसात निकाल जाहीर होईल, असे पत्रही दिले. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या असे पत्र त्यांना SET प्रमुख कापडनीस यांनी दिले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष ऋषी परदेशी व राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष मोनिका बैलारे  यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे उपोषण सोडण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळामुळे आंदोलनाला यश आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदेवराव गायकवाड, विद्यार्थी शहराध्यक्ष ऋषी परदेशी, युवती अध्यक्ष मनाली भिलारे, राज पाटील, सत्यम पांडे आणि सोनाली गाडे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.