मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सहा अल्पवयीन मुली पोहोचल्या शाहरुखच्या घरी

बॉलिवूड बादशाह शाहरूख खानला बघण्यासाठी एकाच कुटुंबातील सहा अल्पवयीन मुली घरातील कुणालाही न सांगताच रेल्वेने त्यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर जाऊन पोहोचल्या़. घरातील सहाही मुली एकाचवेळी गायब झाल्याने पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली़ पोलिसही गोंधळले. अचानक इतक्या आणि एकच घरातील मुली गायब होणे अवघड आहे. पालकांनी मुली मुंबईला जाऊ शकतात अशी शक्यता वर्तविल्याने पोलीस नाईक पवार व पोलीस शिपाई विघे यांना मुंबईला तपासासाठी पाठविण्यात आले़.
 
यापूर्वी रेल्वे पोलीस, ठाणे, कसारा, कल्याण पोलीस ठाण्यास व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मुलींचे फोटो पाठविण्यात आले होते. रात्रभर मुंबईतील विविध बसस्थानके तसेच रेल्वेस्थानकांवर पाहणी केली़. यानंतर शाहरूखचे आकर्षण असल्याची माहिती मिळताच बांद्रा येथील मन्नत बंगल्यासमोर गेले असता तिथे या मुली आढळून आल्या़ त्यांनी या मुलींना ताब्यात घेऊन नाशिकला आणले.