1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 जुलै 2025 (15:07 IST)

शनी शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी त्यांच्या निवासस्थानी आज सोमवारी 28 जुलै रोजी शनी शिंगणापूर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मागील  काही दिवसांपासून शनी शिंगणापूर संस्थान विविध मुद्यांमुळे चर्चेत आहेत. विश्वस्त मंडळातील अंतर्गत वाद, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप, आणि इतर कारणांमुळे देवस्थान वादाच्या भोवऱ्यात आहे.
या घटनेमुळे देवस्थान परिसरात खळबळ उडाली आहे. शेटे यांनी आत्महत्या का केली अद्याप हे कळू शकले नाही. 
शेटे यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आला. ते तणावाखाली असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले असून त्यानी असे टोकाचे पाऊल का घेतले याचा तपास पोलीस करत आहे. शेटे यांच्या निधनाने देवस्थान आणि प्रशासकीय वर्तुळात हळहळ केली जात आहे. 
Edited By - Priya Dixit