गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जून 2017 (16:54 IST)

राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेतील : शरद पवार

sharad panwar
'देशातील-राज्यातील शेतकरी संकटात आहे. रस्त्यावर उतरुन संघर्ष करत आहेत. अशा वेळी केंद्र व राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेतील'',  अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. सरकारने सर्वांना एकत्र आणून चर्चा करावी मार्ग काढावा, असा सल्लाही पवार यांनी दिला आहे.  एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पवार यांनी शेतकरी संपासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर महिला शेतकरी भगिनीवर कठीण परिस्थिती ओढावते. असे होऊ नये यासाठी सरकारने त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळेल असे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे. “ राज्य आणि देशातील राज्यकर्त्यांनी शहाणपणाचा निर्णय लवकर घ्यावा आणि खऱ्या अर्थानं बळीराजाचं राज्य आणावं एवढंच मला वाटतं” असंही त्यांनी सांगितले.