1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (14:49 IST)

पवार यांनी शब्द पाळला, बारामतीहून 100 किलो साखर पाठवली

ठळक बातमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शब्द पाळत हवामान विभागासाठी खास बारामतीहून 100 किलो साखर पाठवली. याआधी वेधशाळेने दिलेला अंदाज खरा ठरला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन असं शरद पवार उपरोधाने म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. त्यामुळे पवारांनी बारामतीवरुन 100 किलो साखर वेधशाळेतील अधिकाऱ्यांसाठी पाठवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला. ही साखर अंकुश काकडे आणि पदाधिकारी दुपारी हवामान खात्यातील अधिकाऱ्यांना देणार आहेत.