शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (09:18 IST)

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. आज 31 ऑगस्टला ही बैठक होत आहे.आज संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या बैठकीत कामकाजाचा आढावा आणि विविध विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटीस,भाजपची नुकतीच झालेली जन आशिर्वाद यात्रा या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला महत्त्व आहे.या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणं अपेक्षित आहे. यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील,जितेंद्र आव्हाड,राजेश टोपे, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व 16 मंत्र्यांचा समावेश असेल.
 
आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा, प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन यावर चर्चा होईल. तसेच ईडी, सीबीआय धाडसत्र यावरही प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ईडीने नुकतंच शिवसेना नेते अनिल परब यांना नोटीस पाठवली आहे तर शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच कार्यालयांवर छापेमारी केली. जरी हे धाडसत्र शिवसेना नेत्यांवर असलं तरी महाविकास आघाडी म्हणून सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र आहेत. त्यामुळे याबाबत राष्ट्रवादीची भूमिका किंवा रणनीती काय असू शकते त्यावर चर्चा होऊ शकते. दुसरीकडे 100 कोटी वसुलीप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आहेत.सीबीआयने अनिल देशमुख यांच्या कार्यलयांवर धाडी टाकल्या होत्या.अनिल देशमुखांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.