संबंधित माहिती
- 'न टायर्ड, न रिटायर्ड, मी तर फायर'; शरद पवारांचा अजितांना इशारा, म्हणाले- सर्व बंडखोर राष्ट्रवादीतून बाहेर पडतील
- महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपदावरून थेट सरकारमध्ये मंत्री झालेले 6 नेते, अजित पवारांसह अनेक मोठी नावे
- शरद पवारांनी घेतलेली बैठक अनधिकृतच - प्रफुल्ल पटेल
- राष्ट्रवादीतील फुटीला भाजप नव्हे तर खुद्द शरद पवारच जबाबदार - बावनकुळे
- शरद पवार विरुद्ध अजित पवार: निवडणूक आयोग 'राष्ट्रवादी'चा ताबा कुणाकडे देणार?
Sharad pawar : शरद पवार पुन्हा पावसात भिजले
social media
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या समवेत काही मोजकेच नेता आणि आमदार आहे.आता शरद पवार यांनी एक्शन मोड घेतले आहे. त्यांनी आजपासून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून आज ते नाशिकात पोहोचले तिथे ते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहे. राज्यात सर्वत्र पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसात शरद पवार मुंबईहून नाशिकात जाण्यासाठी निघाले. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. दरम्यान शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले असल्याचा फोटो सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे.
शरद पवारांचा पावसात भिजलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये "भाग गये रणछोड सभी, देख अभी खडा हूँ मैं, असे लिहिले आहे. सगळे पळकुटे पळून गेले तरी ही मी अजून उभा आहे, मी ना थकलोय, ना हरलोय रणामध्ये अटळपणे उभा आहे, म्हणत असे भाव मांडले आहे.
शरद पवार येवल्याच्या दिशेने जात असताना पावसात भिजले. पक्ष उभारणीसाठी राज्य पिंजून काढताना पावसात भिजले आहे . त्याचा परिणाम राजकीय वातावरणावर काय होतो हे बघण्यासारखे आहे.
Edited by - Priya Dixit
