1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Sharad Pawar's blunt advice to PM Modi on India's relations with neighbouring countries

भारताच्या शेजारील देशांसोबतच्या संबंधा बद्दल शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सडेतोड सल्ला

Sharad Pawar
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) 26 व्या स्थापना दिनाच्या समारंभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारताच्या शेजारील देशांसोबतच्या बिघडत्या राजनैतिक परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान मोदींना भारताच्या शेजारील देशांसोबतच्या संबंध सुधारण्या बद्दल सल्ला दिला. 
शरद पवार म्हणाले, "आपल्या आजूबाजूला पाकिस्तान, चीन, बांगलादेश आणि श्रीलंका असे देश आहेत. एक काळ असा होता जेव्हा भारत हा पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली सर्वांना सोबत घेऊन चालणारा देश होता. आज आपण पाहत आहोत की चीन आणि पाकिस्तानशी संबंध आधीच तणावपूर्ण आहेत, परंतु आता बांगलादेश आणि श्रीलंकेबाबतही परिस्थिती स्पष्ट नाही."
ते म्हणाले, "ज्या बांगलादेशच्या स्वातंत्र्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली होती, तो आता पूर्णपणे आपल्यासोबत दिसत नाही. श्रीलंकेबद्दलही शंका आहे की ते चीनच्या प्रभावाखाली आले आहे की भारतासोबत उभे आहे.
शरद पवार यांनी सध्याच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाले, "या परिस्थितीवरून असे दिसून येते की भारताचे सध्याचे नेतृत्व शेजारील देशांशी संवाद राखण्यात अपयशी ठरले आहे. जर संवादाची प्रक्रिया लवकरच सुरू झाली नाही, तर देशाला त्याची राजकीय आणि धोरणात्मक किंमत मोजावी लागू शकते."
असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit   
 
पुढील लेख
LIVE: २०२६ पर्यंत सर्व नक्षलवादी कॅडर नष्ट केले जातील-देवेंद्र फडणवीस