राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर शिंदे संतापले, म्हणाले-
सध्या राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका माध्यम प्रतिनिधीने ठाकरे बंधू एकत्र येण्या बद्दल प्रश्न विचारले असता ते संतापले आणि त्यांनी पत्रकाराला कामाबद्दल बोलण्यास सांगितले.
शनिवारी शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दरे येथे गेले असता एका मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांना शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील समेटाच्या चर्चेवर त्यांनी प्रतिक्रिया विचारली असता शिंदे पत्रकारावर संतापले आणि त्यांनी पत्रकाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चला कामा बद्दल बोलू या म्हणाले.
राज ठाकरे यांनी चित्रपट निर्मित महेश मांजरेकरांच्या पॉडकास्ट मुलाखतीत शिवसेना युबीटी उद्धव ठाकरे यांच्या सोबत काम करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले होते. काही आठवड्यांपूर्वी या मुलाखतीची रिकॉर्डिंग करण्यात आली असून शनिवारी ती प्रसिद्ध झाली. या नंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा चर्चा सुरु झाल्या.
त्यांनी असेही म्हटले की प्रश्न असा आहे की उद्धव त्यांच्यासोबत काम करू इच्छितात का? उद्धव आणि राज ठाकरे यांनी जवळजवळ दोन दशकांच्या कटू वियोगानंतर किरकोळ मुद्दे दुर्लक्षित करून हातमिळवणी करू शकतात असे सांगितल्यानंतर, संभाव्य समेटाच्या अटकळींना उधाण आले. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे कठीण नाही, असे मनसे प्रमुख म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्यांचा समावेश नसल्यास ते किरकोळ वाद बाजूला ठेवण्यास तयार आहेत.
Edited By - Priya Dixit