उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दिशेने रवाना, रात्री केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्याची शक्यता
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहे. तसेच दिल्लीत रात्री उशिरा शिंदे केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महायुती सरकारच्या अनेक मंत्र्यांचे आणि आमदारांचे वाद समोर आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत वादग्रस्त मंत्र्यांना इशारा देऊन जरी टाळण्यात आले असले तरी, शिंदे यांच्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या वादांमुळे भाजपमधील नाराजी शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर, शिंदे शाह यांना भेटण्यासाठी आले आहे. संध्याकाळी ७ वाजता राज्यसभेत भाषण केल्यानंतर शिंदे अमित शाह यांना भेटू शकतात असे सांगितले जात आहे.
Edited By- Dhanashri Naik