शिव ठाकरे-राज ठाकरे भेट
अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकी आणि बिग बॉस 16 चा उपविजेता शिव ठाकरेने आज मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे.
यावेळी शिवसोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही उपस्थित होते. शिवचा राज ठाकरेंच्या घराबाहेरचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. राज ठाकरे यांनी अभिनंदन करायला बोलावले होते, असे शिवने माध्यमांना सांगितले. या भेटीनंतर त्याने भेटीत काय काय झालं ते सविस्तरपणे सांगितले. एक मराठी मुलगा हिंदी बिगबॉसमध्ये जातो. त्याचे देशभर चाहते त्यार होतात. ही गोष्ट राज ठाकरे यांना आवडली म्हणून त्यांनी मला बोलावून घेतलं. माझं अभिनंदन केलं, असं शिव ठाकरे म्हणाला. शिवाय पक्षा पलिकडे जात राज ठाकरे लोकांना जवळ करतात. त्यांच्याशी आस्थेने बोलतात, असंही शिवनं सांगितलं.