मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2019 (17:00 IST)

शिवनेरी, अश्वमेध च्या तिकीटात कपात

मुंबई-पुणे मार्गावर धावणारी शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत भरगोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवार पासून, म्हणजे ८ जुलै पासून लागू होणार आहेत. 
 
गेली १५ वर्षे  मुंबई-पुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची "शिवनेरी" ही बस सेवा प्रवाशांच्या सुविधेसाठी सज्ज आहे.  या मार्गावर किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी सेवा म्हणून शिवनेरी बसकडे पाहिलं जातं. सध्या महाराष्ट्रातील  वेगवेगळ्या ७ मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या केल्या जातात, याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जात आहे. या प्रतिष्ठीत बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही प्रतिष्ठीत सेवा सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा उद्देश असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.