शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 फेब्रुवारी 2017 (16:47 IST)

नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस- शिवसेना

नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले. रस्ता डांबरीकरण, पाणी शुद्धीकरण यातील भ्रष्टाचाराचे हे प्रकरण आहे. नागपूर पालिका घोटाळा प्रकरणी 27 फेब्रुवारी 2001 ला नंदलाल समितीने अहवाल दिला. त्या अहवालात नंदलाल समितीने देवेंद्र फडणवीसांवर ठपका ठेवल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. या घोटाळ्याविरोधात शिवसेना आवाज उठवणार असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे. नंदलाल समितीने आपल्या अहवालात फडवणीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस केल्याचेही परब यांनी सांगितले.