शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 फेब्रुवारी 2017 (16:49 IST)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिवसेनेला पाठिंबा जाहीर

नाशिकपाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला दणका दिला आहे. जिल्हा परिषद आणि  महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रचारसभेत याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. जिल्हा परिषद तसंच महापालिका निवडणुकीत जागावाटपात भाजपने विश्वासात घेतलं नाही, साधी चर्चाही केली आहे. उलट युती नसताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा फोटो, प्रचारात वापरत असल्याचा आरोप नाशिकचे युवा स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी  केला आहे. ग्रामीण भागात नोटाबंदी, शेतीमालाचे भाव तसंच कांद्याचे आंदोलनांबाबत भाजपविषयी नाराजी आहे.