शनिवार, 5 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (18:39 IST)

धक्कादायक! 14 वर्षाच्या मुलाने वृद्धास चिरडले

accident
मुंबईच्या पवई कांदिवली परिसरात एका 14 वर्षीय मुलाने रस्त्यावरून जाणाऱ्या एका वृद्धाला चिरडल्याची धक्कदायक घटना घडली आहे. हा सर्व अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात  कैद झाला असून या अल्पवयीन मुलाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. 
 
या सोसायटीच्या गेट मधून गाडी बाहेर काढताना गाडीचा वेग वाढला आणि गाडीवरील नियंत्रण सुटून गाडीचा वेग अचानकपणे वाढला आणि रस्त्यावरुन जात असलेल्या वृद्धाला चिरडले.
 
 हा अपघात सीसीटीव्ही व्हिडीओ मध्ये कैद झाला आहे. या व्हिडीओ मध्ये  गाडी नागमोडी पद्धतीने वेगाने पुढे वाढली असून वृद्धाला चिरडले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलाने आपल्या पालकांची गाडी हातात घेतली असून या मुलावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.  











Edited by - Priya Dixit