1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 24 एप्रिल 2023 (09:10 IST)

विद्यार्थ्यांमध्ये खळबळ, एमपीएससी चे 1 लाखाहून अधिक हॉल तिकीट टेलिग्रामवर व्हायरल

एमपीएससी चे 1 लाखाहून अधिक हॉल तिकीट टेलिग्रामवर व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे.  या प्रकरणी नवी मुंबईतून एकाला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बेकायदारित्या माहिती प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा  एमपीएससी 2023 A टेलिग्राम चॅनलचा तो ऍडिमन आहे.
 
एमपीएससी अभ्यासक्रमावर काहीच महिन्यांपूर्वी विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यात आत 30 एप्रिलला होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेचं हॉल तिकीट आयोगानं विद्यार्थ्यांना देण्याआधीच टेलिग्रामवर व्हायरल झाले. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, आणि क च्या परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल झाल्याने एमपीएससीची वेबसाईट हॅक झाल्याचा आरोप करण्यात आला.  टेलिग्रामवर तब्बल एका लाखापेक्षा जास्त हॉल तिकिट अपलोड करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एमपीएससीचा पेपर सुद्धा हॅकरकडे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor