शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (08:13 IST)

धक्कादायक! मुलानेच केली जन्मदात्या पित्याची निर्घ्रूण हत्या

नाशिकच्या धोंडे गाव गिरणारे येथे मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.वडील झोपेत असतानाच मुलाने कुऱ्हाडीनेवार करून मुलाने त्यांची हत्या केली. 

धोंडे गाव (गिरणारे) भागात राहणारे नामदेव श्रावण बेंडकुळे वय वर्ष 73 यांचा मोठा मुलगा संशयित हरिश्‍चंद्र नामदेव बेंडकुळे या मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याची रात्रीच्या सुमारास डोक्यात कुऱ्हाड टाकून हत्या केली आहे. यापूर्वी त्यांच्यामध्ये शेतीच्या कामावरून वाद-विवाद होत होते. दोन दिवसापूर्वी वडील मुलाला काम करण्यावरून बोलले होते.त्याचा मनात राग धरून रात्री वडील झोपेत असताना त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार करून हत्या केली आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.