1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 फेब्रुवारी 2024 (10:34 IST)

तीन दिवसापूर्वी गोळीबार : माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असतांना चाळीसगाव शहरात तीन दिवसांपूर्वी एका टोळक्याने केलेल्या गोळीबारात भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र (बाळू ) मोरे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरात दि.७ फेब्रुवारी रोजी माजी नगरसेवक मोरे यांच्यावर गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. यात एका कारमधून आलेल्या टोळक्याने माजी नगरसेवक महेंद्र ( बाळू ) मोरे हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतांना त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला होता. यानंतर हे टोळके कारमधून पळून गेले होते.
 
सदर घटना घडताच माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र उपचार सुरू असतांना रात्री उशीरा त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. दरम्यान, या प्रकरणी आधीच हल्ला करणारे पाच आणि कट रचणारे दोन अशा सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor