शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (08:59 IST)

सिल्व्हर ओक हल्ला, अखेर नागपूरच्या 'त्या' कर्मचाऱ्याला अटक

arrest
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनातील कर्मचाऱ्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भडकावले असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये नागपूरच्या व्यक्तीचाही वारंवार उल्लेख होत होता. सदावर्ते आणि नागपूरची ही व्यक्ती संपर्कात होती असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अखेर पोलिसांनी या नागपूरच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
 
 गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या चॅटची पडताळणी करण्यात आली. व्हॉट्सअॅप तपासल्यानंतर नागपूरच्या व्यक्तीचे कनेक्शन उघडकीस आले होते. नागपूरची व्यक्ती कोण आहे याबाबत चौकशी करण्यासाठी सदावर्तेंची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात केली होती.
 
हल्ल्याच्यापूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते आणि नागपूरची व्यक्ती संपर्कात होती. नागपूरची व्यक्तीसुद्धा एसटी कर्मचारी आहे. एसटीमध्ये यांत्रिक पदावर ही व्यक्ती कार्यरत आहे. या व्यक्तीचे नाव संदीप गोडबोले असं आहे.