शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2016 (11:05 IST)

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी आबांची मुलगी

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. स्मिता पाटील या पिता आर आर पाटील यांच्या निधनानंतर सक्रीय राजकारणात दिसत होत्या. त्यामुळे त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा योग्य पद्धतीने सांभाळतील या विश्वासाने स्मिता पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.