सापांच्या विषाचा तस्करीचा भंडाफोड
पुण्यातील चाकणमधील खराबवाडी येथे एका फ्लॅटमध्ये सापांच्या विषाचा तस्करीचा भंडाफोड करण्यात आला आहे. यावेळी विक्रीसाठी ठेवलेले विष आणि तब्बल १२५ सापांसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण पोलिसांनी ही कारवाई केली. एका २ बीएचके फ्लॅटमध्ये आरोपी व त्याची पत्नी दोन वर्षापासून राहत होते. या फ्लॅटमधून ७० कोब्रा आणि सर्वात विषारी घोणस जातीचे ४५ साप पकडले आहेत. तसेच दोन बंद बाटलीत २५ ग्रॅम विषही यावेळी जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घतले असून, चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.