सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (09:04 IST)

सोलापूर: आंदोलकाने तक्रार करत स्वतःला पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

chandrakant patil
सोलापूरमध्ये  पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हा नियोजन बैठकीसाठी सोलापूर दौऱ्यावर आहेत. मात्र यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्या समोर एका आंदोलकाने तक्रार करत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात एकच गोंधळ झाला. अंगावर डिझेल ओतून या व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन हा सगळा प्रकार थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटू न दिल्याने तरुणाचा ताफ्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. माढा तालुक्यातील टाकळी येथील दादासाहेब कळसाईत तरुणाचा डिझेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली होती. नियोजन भावनाच्या बाहेर पालकमंत्र्यांचा ताफा येताच आडवे येत या तरुणाने डिझेल ओतून घेतले.
 
आमदार निधीतून 2018 साली सात लाख रुपयांचे व्यायामशाळा न बांधता त्या जागी बंगला बांधाल्याचा आरोप तरुणाने केला होता. त्या संदर्भात तरुणाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घ्यायची होती. मात्र पालकमंत्र्यांना भेटू न दिल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे. यावेळी हा तरुण माझी तालीम चोरीला गेली आहे, तालमीतले साहित्य चोरीला गेले असे ओरडून सांगत होता. पण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor