1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 मार्च 2022 (14:52 IST)

सोलापूरकरांना मिळणार 170 एमएलडी पाणी

सोलापूर शहरासाठी यापूर्वी पाणीपुरवठा करण्यासाठी 110 एमएलडी नियोजन करण्यात आले होते. मात्र, वाढीव लोकसंख्या पाहता 170 एमएलडी पाणीपुरवठय़ासाठी शासनाने मंजुरी दिली होती. या योजनेसाठी राज्य शासनाकडून 200 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तर महापालिकेच्या वतीने 100 कोटी हिस्सा भरावा लागणार आहे. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली.
 
स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक नियोजन भवन येथे चेअरमन असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, सभागृह नेते शिवानंद पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त हरीश बैजल, महापालिका आयुक्त पी. शिकशंकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी आदी उपस्थित होते.
 
राज्य शासनाने मान्यता दिलेल्या 170 एमएलडी उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीला व आयसीसीसी या डीपीआर संदर्भात बैठकीत चर्चा करून मंजुरी देण्यात आली. सोलापूर शहरासाठी यापूर्वी पाणीपुरवठा करण्यासाठी 110 एमएलडी पाण्याचे नियोजन करण्यात आले होते.