सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 19 जून 2024 (09:23 IST)

Solapur :बसची वाट पाहणाऱ्या महिलांना ट्रकने चिरडले, 6 ठार,ट्रक चालक ताब्यात

arrest
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर- कराड मार्गावर बस येण्याची वाट बघत असलेल्या 6 महिलांना एका वेगाने येणाऱ्या ट्रकने उडवले. पोलीस माहिती मिळाव्यावर घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आणि शव विच्छेदनासाठी पाठविले 
 
सदर अपघात मंगळवार संध्याकाळी 4:30 पंढरपूर -कराड मार्गावर चिकमहूड जवळ बंडगारवाडी पाटी जवळ झालं. या अपघातात सहा महिलांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाले आहे. 
 
या महिला शेतात मजुरी करायला आल्या होत्या दुपारी काम सपंवुन बंडगर वाडी पाटी रोडच्या कडेला एसटी बसची वाट पाहत होत्या.दरम्यान पंढरपूरहून येणाऱ्या वेगवान ट्रक ने सर्वाना चिरडले. घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक ग्रामीण घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. 
 
पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit