1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (18:36 IST)

रावणाचा जीव बेंबीत होता, तसा काहींचा जीव मुंबईत; मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

uddhav devendra
रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांच्यासह भाजपावर केली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता,काल देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर अनेक आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
 
मुख्यमंत्र्यांनी मुंबईत केलेल्या कामांचा पाडा आज वाचून दाखवला. यावेळी 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सूट दिली आहे. 139 प्रकारच्या मोफत तर काही नाममात्रं दरात चाचण्या करून देत आहोत. मेट्रोच्या काळात 10 हजार कोटीच्या वाढीचा प्रस्ताव हा आमच्या काळात नाही. तुमच्या काळातला आहे. मुंबईत मराठी भाषा भवन उभारणार, 2 एप्रिलपासून कामाला सुरुवात करतोय असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
 
“शिवभोजन थाळीतून १० रुपयांमध्ये जेवण देत आहोत ही अभिनाची गोष्ट आहे. गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात जेवण मिळवून देण्याचे मोठे काम आपण करत आहोत. काही लोक आरश्यात बघितली तरी भ्रष्टाचार झाल्याचे म्हणतात. कारण त्यांच्या मते तो आरसा बनवण्यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसतो,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी  लगावला.
 
पालिकेने कोविड काळात चांगलं काम केलं
 
मुंबई मॉडल जगभरात प्रसिद्ध झालं आहे. सर्वांनी त्याचं कौतुक केलं. कोविडमधून बरे होतात. पण द्वेषाच्या कावीळ जरी झाली असेल तर त्याचा उपचार कोणत्या दवाखान्यात करता येत नाही. कावीळ झालीय. पण द्वेषाची कावीळ बरीच होऊ शकत नाही. त्याला काय करणार, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी फटकेबाजी केली.कोविड काळात मोदींना पक्षभेद विसरून सर्वांना समान मदत केली. मी कबूल करेल. त्याबाबत मी कद्रूपण करत नाही. केंद्राने सेक्रेटरीचा गट तयार केला होता.