बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (10:54 IST)

एसटीच्या तिकीट वाढ

राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात बुधवारी मध्यरात्रीपासून दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशा वीस दिवसासाठी ही भाडेवाढ असणार आहे.
 
खासगी ट्रॅव्हल्सकडून सणासुदीच्या काळात तिकीट दरात दरवाढ केली जाते. याच धर्तीवर राज्य परिवहन महामंडळानेही भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गत वर्षी दिवाळीच्या सुट्टीत एसटी महामंडळाने विविध सेवेप्रमाणे २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ केली होती. यावर्षी मात्र ही दरवाढ एकसमान अशी १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. आता एसटीनेही महसूल वाढीसाठी हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.