सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (22:31 IST)

दिवाळीत राज्यात एसटी बस सुसाट धावणार

st buses
दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग,या विविध मागण्यांसाठी एसटी संप पुकारण्यात आला होता. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहन  दिले .सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली.

या वर मंत्री उदय सामंत यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत महत्वाच्या चार मुद्द्यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती उदय सामंतांनी दिली. या संदर्भात दिवाळी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीचं आयोजन केले जाणार. अशी माहिती उदय सामंतांनी पत्रकार परिषदेत दिली. 

उदय सामंत म्हणाले, एसटीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून एसटी कष्टकरी जनसंघाकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. गुणरत्न सदावर्ते हे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मागणीसाठी  सदावर्ते यांनी एसटी संप पुकारला होता. या संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. या बैठकीत चार मुद्द्यांवर चर्चा झाली त्या नंतर संप मागे घेण्यात आला.  या दिवाळीला एसटी सुसाट वेगाने धावणार आहे.  
 




Edited by - Priya Dixit