गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (09:20 IST)

सिद्धिविनायक मंदिरातून ‘गजयात्रा’ मोहिमेचा शुभारंभ

वाइल्डलाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या वतीने सिद्धिविनायक मंदिरात देशातील जंगली हत्तींना बचाव उपक्रमांतर्गत ‘गजयात्रा’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. 

जंगली हत्तींसाठी असलेली संकुचित जागा आणि हत्ती क्षेत्रांच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. देशात सुमारे ३० हजार जंगली आशियाई हत्ती असून ही संख्या जगातील एकूण प्रजातीच्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. यावेळी अध्यक्षीय भाषणात सुरेश प्रभू यांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. तर दिया मिर्झा म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीमध्ये चॅम्पियन आॅफ नेचर बनण्याची क्षमता आहे. गजयात्रा यशस्वी होण्यासाठी लोकांचे सहकार्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे.