मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जुलै 2020 (16:17 IST)

अजूनही नाराजी नाट्य सुरु, आता अशोक चव्हाण नाराज

राज्यात महाविकास आघाडीतील सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण हेच नाराज असल्याची माहिती समोर येत असून कॅबिनेट बैठकीतच त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे.
 
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीला अधिकारी जबाबदार असून, आता तर अशोक चव्हाण यांनी देखील संबधित मंत्र्यांना विचारात न घेता अधिकारी प्रस्ताव मंजूरीसाठी देत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांना न विचारता मंजुरीसाठी मांडल्याने अशोक चव्हाण संतप्त झाले असून, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान याआधी देखील अशोक चव्हाण यांनी नोकरशहांची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.