शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 जून 2023 (15:24 IST)

समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक

pune bangalore national highway
समृद्धी महामार्ग कोणत्या न कोणत्या घटनेमुळे चर्चेत आहे. गोमाशे जिल्ह्यातून कारंजा ते शेलू बाजारपेठ च्या दरम्यान ढाकली किनखेड परिसरात समृद्धी महामार्गावर प्रवाशांनी भरलेल्या बसवर आठ जणांच्या टोळक्यानं दगडफेक करण्याची धक्कादायक घटना रात्री 12 :30 ते 1 च्या सुमारास घडली आहे. बस लुटण्याच्या उद्देश्याने या टोळक्याने धावत्या बसवर दगडफेक केली. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस वेगानं तिथून काढली. आणि काही अंतरावर नेऊन थांबवली.

बस एकाएकी थांबल्याने मागील वाहतूक देखील थांबली. दरोडेखोर अंधारात पळून गेले. या घटनेत चालकाच्या बाजूने बसलेले दयाराम राठोड हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर बस मधील इतर काही प्रवासी दगडफेकीमुळे किरकोळ जखमी झाले आहे. 

या घटनेमुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. या महामार्गावर पोलीस गस्त वाढवण्याची मागणी प्रवासी करत आहे. 
 
या महामार्गावर अपघाताच्या घटना सतत घडतात. अपघातांना कमी करण्यासाठी राज्यसरकार कडून उपाय योजना राबवल्या जात आहे. आता बसवर दगडफेक करण्याची घटना घडली आहे. 
 
Edited by - Priya Dixit