गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 नोव्हेंबर 2023 (07:52 IST)

मळगाव स्थानकावर एक्स्प्रेसना थांबा द्या !

vande bharat
न्हावेली सावंतवाडी सिंधुदुर्ग मळगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस मंगलोर एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस आणि नागपूर मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा,अशी मागणी मळगाव पंचक्रोशीतील लोकप्रतिनीधींनी केली आहे.दरम्यान येथील रेल्वे स्टेशन समस्यांच्या गर्तेत आहे.त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अनेक गैरसोईना सामोरे जावे लागत आहे.याबाबत प्रवाशांची नाराजी लक्षात घेता तात्काळ योग्य तो निर्णय घेऊन समस्या दूर करा,अन्यथा आंदोलन करु असा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला.याबाबतचे निवेदन मळगाव,निरवडे,वेत्ये,होडावडे गावातील सरपंच उपसरपंचासह ग्रामस्थांनी स्टेशनमास्तर प्रतिक्षा गावकर यांच्याकडे दिले आहे.याबाबत आवश्यक सौ.गावकर यांनी यावेळी दिले.यावेळी निरवडे सरपंच सुहानी गावडे,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे,मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर,निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर,भूषण बांदिवडेकर,प्रकाश जाधव,सागर तळवडेकर,एकनाथ जाधव,काका पांढरे,बबन आसोलकर,साई गावडे,गौरव माळकर,सिताराम गावडे,आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.