शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (18:10 IST)

हातगाडीवर सर्रास विकला जातोय सडक्या फळांचा रस

pinapal juice
तुम्ही जर फळांचे ज्यूस पीत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण सडलेल्या फळांचं ज्यूस बनवलं जात असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडिओ भिवंडी येथील एका ज्यूस सेंटरचा असल्याचं सांगितलं जातंय. या व्हिडिओत अननसासह सडलेली आंबे सुद्धा दिसत आहे. या ज्यूस सेंटरची पोलखोल एका सज्ञान युवकाने आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केली आहे. 
 
 विशेष बाब म्हणजे जेव्हा हा युवक व्हिडिओ तयार करीत होता. तेव्हा ज्यूस सेंटरच्या कामागाराने हे अननस फेकून दिले आहेत. दुसरीकडे हा व्हिडिओ समोर येतात परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.