शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जून 2017 (23:16 IST)

दहावीच्या निकाला आधीच विद्यार्थ्याची आत्महत्या

नाशिकमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याने निकाल लागण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याने  घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शहरातील पाटीलनगर येथे कालिदास मुंगेकर हे गेल्या २० वर्षांपासून राहात आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा कौस्तुभ (१५) हा सेंट फ्रान्सिस शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता.  यंदा दहावीची परीक्षा दिली होती. दहावीचा निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाची तारीख देण्यात येत होती.  दहावीचा निकाल असे सोशल मीडियावर दिवसभर संदेश फिरत असल्याने आपण पास होऊ की नाही याचा कौस्तुभने धसका घेतल्याची चर्चा आहे.