शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (12:53 IST)

वेठबिगारीला कंटाळून मजुराची आत्महत्या

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात एका मजुराने वेठबिगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्क्कादायक घटना घडली.काळू पवार (48)असे या कातकरी शेत मजुराचे नाव आहे. त्याला आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी कफन घ्यायचे होते.मात्र मुलासाठी कफन घेण्या एवढे पैसे देखील त्याच्या कडे नव्हते.म्हणून त्याने रामदास कोरडे या मालका कडून 500 रुपये उसने घेतले.मालकाने पैसे फेडण्याच्या मोबदल्यात मजुराला गडी म्हणून राबवून घेतले. 
 
मालकाचा जाचाला कंटाळून त्याने गळफास लावून आपले आयुष्यच संपवले. मालकाच्या जाचाला कंटाळला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या पत्नी सावित्रीने केला असून मालका विरोधात तक्रार केली आहे.

या प्रकरणात मालक रामदास अंबु कोरडे याच्या विरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात ''बंध बिगार पद्धती(उच्चाटन )अधिनियम 1976'' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.