1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Supriya Sule scolds her opponents saying that a full pot never makes a sound

भरलेलं भांडं कधी आवाज करत नाही म्हणत सुप्रिया सुळे यांचा विरोधकांना टोला

जी भांडी मोकळी असतात ती खूप आवाज करतात. भरलेलं भांडं कधी आवाज करत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला आहे. “करायचा तेवढा आवाज करा, पडलं तर बघू काय करायचं. आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. आज आम्ही आहोत कधीतरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही,” असंही त्या म्हणाल्या आहेत. इंदापूरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा प्रचार करताना त्या बोलत होत्या.
 
“लोकं सारखं म्हणतात की हे सरकार पडणार. हे ऐकताना मला गमंत वाटते. मोकळी भांडी फार वाजतात. त्यामुळे भांड्यांनी करायचा तितका आवाज करा. सरकार पडलं तर बघू काय करायच ते…हे सरकार स्थिर आणि टिकणारे सरकार आहे,” असं सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितलं.
 
पुढील लेख
जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार झालीय : किशोरी पेडणेकर