ज्यादिवशी पवारांना वाटेल तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळेना मुख्यमंत्री करावे : चंद्रकांत पाटील

chandrakant patil
Last Modified शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (17:19 IST)
शरद पवार
यांनी महाविकास आघाडी सरकारची मोट बांधली. सध्या ते आपल्या तालावर सरकारही चालवत आहेत. मग ज्यादिवशी पवारांना वाटेल तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करावे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
यांनी केले. मराठा समाजातील महिला मुख्यमंत्री कोण हा आम्ही ठरवण्याचा विषय नाही. जिच्यात क्षमता आहे ती स्त्री मुख्यमंत्री व्हावी. त्यात कोणत्या एका समाजाचं असं काही नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शुक्रवारी मुंबईतील एका कार्यक्रमात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना शनिवारी पुण्यात याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मराठा महिला मुख्यमंत्री कोण, हा आम्ही ठरवण्याचा विषय नसल्याचे स्पष्ट केले. उद्या शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करावेसे वाटले तर त्यांनी करावे. त्यात आमचा रोल काय? आम्ही सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे भाजपने कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर तर वेळ लागणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

मनसेचे होर्डिंग, आदित्यनाथ यांचा युपीचा "ठग" असा उल्लेख

मनसेचे होर्डिंग, आदित्यनाथ यांचा युपीचा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बाँलिवूडच्या ...

वडिलांच्या संपत्तीवर माझा हक्क, भैयूजी महाराज यांची मुलगी ...

वडिलांच्या संपत्तीवर माझा हक्क, भैयूजी महाराज यांची मुलगी कुहू देशमुखचा दावा
भैयूजी महाराज यांची मुलगी कुहू देशमुखने वडिलांच्या संपत्तीवर माझा हक्क असून तो ...

म्हणून उर्मिला मातोंडकर यांनी संजय राऊत यांच्या कन्यांचे ...

म्हणून उर्मिला मातोंडकर यांनी संजय राऊत यांच्या कन्यांचे मानले आभार
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या कन्या विधिता आणि ...

पाली येथे भीषण अपघात, गॅस पाईपलाईनची पाइप बसमध्ये धडकली

पाली येथे भीषण अपघात, गॅस पाईपलाईनची पाइप बसमध्ये धडकली
रस्त्यालगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम चालू होते. हायड्राला मशीनमधून उचलले गेले आणि ...

लॉस एंजलिस संघ शाहरुखने घेतला विकत

लॉस एंजलिस संघ शाहरुखने घेतला विकत
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आता हॉलिवूडही गाजवाला तयार झाला आहे. परंतु यंदा तो चित्रपटातून ...