शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (16:19 IST)

वॅक्सिंग करताना ही काळजी जरूर घ्या, त्रास होणार नाही

आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण सर्वजण वॅक्सिंग करवतो. जरी केस काढण्यासाठीचे बरेच मार्ग आहेत, परंतु बायका केसांना काढण्यासाठी वॅक्सिंगचा उपायच अवलंबवतात, कारण या द्वारे आपण सहजपणे इनग्रोन केलेल्या केसांना काढू शकता. या मुळे आपली त्वचा गुळगुळीत दिसते. वॅक्सिंग करताना बऱ्याच बायकांना वेदना होते. कदाचित आपल्या बाबतीत देखील असे होऊ शकत. चला तर मग आज आम्ही आपल्याला काही अशा सोप्या पद्धती बद्दल सांगत आहोत, ज्यांना अवलंबवून वॅक्सिंग करताना वेदना कमी होईल.
 
* योग्य व्यावसायिक निवडा - 
ही एक छोटीशी टीप आहे, परंतु यामुळे आपण आपल्या वेदनेला कमी करू शकता. आपण कोणत्याही सलून किंवा पार्लरमध्ये वॅक्सिंग करण्यापूर्वी रिसर्च करुन योग्य एक्सपर्टला शोधावे. अशाने योग्य तकनीकीचा वापर केला जाईल आणि आपण वेदनांपासून मुक्त राहाल. 
 
* बॉडी स्क्रब वापरा - 
त्वचेची काळजी घेणारे तज्ज्ञ म्हणतात की वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेला स्क्रब करणं ही चांगली कल्पना आहे. वास्तविक जेव्हा आपण असे करता तेव्हा हे त्वचेवरील मृत पेशींना काढून टाकते आणि केसांच्या मूळाच्या भोवतालीची मृत त्वचा बाहेर निघून येते तेव्हा यामधून केस काढणे अधिक सहज होते.
 
* टोनर वापरू नये- 
त्वचेचे तज्ज्ञ सांगतात की टोनर किंवा अस्ट्रिन्जन्ट पोर्स किंवा छिद्रांना घट्ट करत आणि केसांच्या फोलिकल्सवर पकड मजबूत होते. अशा मध्ये टोनर वापरल्यावर वॅक्सिंग करवणे वेदनादायक ठरेल.
 
* बर्फ वापरू नये - 
त्वचेचे तज्ज्ञ सांगतात, की काही बायका वॅक्सिंगच्या पूर्वी बर्फाचा वापर करतात. त्यांना असे वाटते की या मुळे त्वचा घट्ट होईल आणि वॅक्सिंग करताना कमी दुखेल. पण त्वचेवर काही ही वापरल्याने छिद्र घट्ट होतात. ज्यामुळे वॅक्सिंग करताना वेदना जास्त होते.
 
* कॅफिन पासून दूर राहा - 
त्वचेची काळजी घेणारे तज्ज्ञ सांगतात की जर आपण वॅक्सिंग करण्याचे ठरवले असेल तर त्या दरम्यान जास्त प्रमाणात कॅफिन वापरू नका. या मुळे आपली त्वचा वॅक्सिंगसाठी अधिक संवेदनशील बनते. त्याऐवजी, आपले शरीर आणि त्वचा हायड्रेट करण्यासाठी भरपूर पाणी प्या. 
 
* येथे वॅक्सिंग करू नये - 
आपण वॅक्सिंग करत असाल तर आपण वॅक्सिंग कोठे करवत आहात या कडे लक्ष द्यावे. उदाहरणार्थ, सनबर्न त्वचा, मस, कापलेल्या ठिकाणी किंवा मुरूम असल्यास वॅक्सिंग करविण्याचा प्रयत्न करू नयेत. या ठिकाणी वॅक्सिंग करवणे धोकादायक ठरेल तसेच या मुळे आपणास त्रीव्र वेदना देखील होऊ शकतात.