शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 11 जून 2020 (21:07 IST)

Skin Care : अंड्याचे हे खास फेसपॅक देणार अवांछित केसांपासून मुक्ती आजच वापरून बघा

सुंदर आणि स्वच्छ त्वचा मिळविण्यासाठी आपण काय नाही करत. जर वेळ येते तेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावरील अवांछित केस काढण्यासाठी सलूनमध्ये जाण्याचा विचार करतो. पण आपण घरच्या घरीच सलून सारखे उपचार करू शकता. आणि चेहऱ्यावरील अवांछित केसांपासून मुक्त होऊ शकतो. आता आपण विचार करीत असाल की कसे काय ? तर आपल्याला त्यासाठी कुठलाही त्रास करून घ्यायचा नाही. आम्ही आहोत न आपल्या साठी. 
 
आपल्या स्वयंपाकघरात बऱ्याच पैकी सौंदर्याचा खजिना दडलेला आहे. त्या वापरून आपण इच्छित त्वचा मिळवू शकता आणि सर्व वस्तू नैसर्गिक असल्यामुळे आपल्या त्वचेला त्याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया काही खास टिप्स ज्यामुळे आपल्याला अवांछित केसांपासून मुक्ती मिळेल.अंडी आपल्याला सर्वांना त्याचे गुणधर्म तर माहीत असणारच. हे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतं, त्याच बरोबर हे सौंदर्याला वाढविण्यासाठी देखील वापरले जाते. 
 
आपण आपल्या चेहऱ्यावरील केसांपासून त्रस्त असाल तर आपल्याला आम्ही काही अंड्याचे फेस पॅक सांगू इच्छितो आहोत. हे पॅक वापरून आपण त्वचेसंबंधी त्रासांपासून सहजरीत्या मुक्त होऊ शकता. अंड्याचे फेसपॅक चेहऱ्यावरील केसांना काढून टाकण्यासाठी सर्वात छान घरगुती उपचारांपैकी एक आहे. अंड्याचे पांढरे भाग त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतं. त्याचबरोबर त्वचेला निरोगी आणि पोषण देण्यासाठी प्रभावी आहे.
 
1 वाटी मध्ये 1 अंड्याचे पांढरे भाग घेऊन त्यात हरभऱ्याच्या डाळीचे पीठ मिसळा. आता ही पेस्ट आपल्या पूर्ण चेहऱ्यावर लावा. चांगल्या प्रकारे कोरडं झाल्यावर हळुवार हाताने मालीश करत करत ह्याला स्वच्छ करा.
 
अंड्याचे पांढरे भाग आणि साखर एकत्र करा. पूर्ण पेस्टला आपल्या चेहऱ्यावर स्क्रब करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावरील मृत पेशी काढण्यास मदत करेल. सोबतच अवांछित केसांपासून सुटका होते. आपल्या चेहऱ्यावर या फेसपॅक ने चकाकी देखील मिळवू शकता.
 
अंड्याच्या पांढऱ्या भागात मध आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या पूर्ण चेहऱ्यावर लावून 10 ते 15 मिनिटे ठेवा. हे पॅक आपल्या अवांछित केसांना काढण्यास मदत करते. त्याच बरोबर चेहरा नितळ आणि तजेल होतो.