शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 18 डिसेंबर 2019 (17:42 IST)

सतेज त्वचेसाठी चंदन, या प्रकारे बनवा फेस पॅक

आपले सौन्दर्य वाढविण्यासाठी केमिकलयुक्त कॉस्मेटिक सोडून काही घरगुती उपाय करणे कधीही फायदेशीर ठरेल. यासाठी चंदन देखील एक उत्तम पर्याय आहे. चंदन घरात सहजच उपलब्ध असतं तसेच यात औषधी गुणधर्म असतात. 
 
चंदन सौंदर्य उपचारांसाठी उपयुक्त आहे. ह्याचा परिणाम त्वचेवर चांगला पडतो. चंदन मुरूम, पुरळ, खरूज या समस्या दूर करण्यात मदत करतं.
 
सूर्यकिरणांपासून त्वचेवर पडणार्‍या प्रभावाला कमी करतं.
 
चेहरा सतेज करण्यासाठी आपण चंदनाचा फेसपॅक बनवू शकता.
फेस पॅकसाठी 1 चमचा चंदन पावडर घ्या. त्यात 1 चमचा हळद घाला. त्यात जरासं दूध मिसळून पेस्ट करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 30 मिनिटे लावा. मुरुमांपासून मुक्ती मिळते.
 
हे पॅक अधिक प्रभावी होण्यासाठी 5 चमचे चंदन पावडर, 2 चमचे बादामाचे तेल, 2 चमचे नारळाचे तेल घालून चेहऱ्यावर लावा. नंतर 30 मिनिटाने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करून घ्या. चेहऱ्यावर तेज येतो.
 
टीप: हे फेस पॅक लावण्याआधी आपला चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या. मगच फेस पॅक लावा.