या प्रकारे निस्तेज त्वचा सतेज बनवा
कडुलिंब आणि तुळस औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात. त्वचा सुंदर बनविण्यासाठी हा एक आयुर्वेदिक उपाय आहे. कडुनिंबाची पाने त्वचेला मुरुमांपासून मुक्त करतेच पण या मुरुमांना येण्यापासून प्रतिबंध देखील करते.
आयुर्वेदिक उपायांमध्ये तुळस आणि कडुलिंबाची पाने कच्ची खायला सांगितले आहे. हे विषाणुरोधी असते. जे जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध लावते आणि ह्याचा सेवनाने शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढते.
सौंदर्यात वाढ होण्यासाठी आयुर्वेदिक उपाय म्हणून ह्यांचा उपयोग करू शकतो.
यासाठी आपल्याला 10 कडुलिंबाची पाने, 10 तुळशीची पाने आणि 2 चमचे गुलाब पाणी घ्यावं लागेल.
कडुलिंब आणि तुळशीच्या पानात गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर सामान रीतीने लावावी. 30 मिनिटाने चेहरा धुऊन घ्यावा.
आठवड्यातून 3 वेळा हा उपाय केल्याने त्वचा सतेज आणि मऊ होण्यास मदत होईल.