बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

या सहा सवयींमुळे आपण दिसताय वयस्कर

वाढत असलेल्या प्रदूषणाचा प्रभाव आमच्या त्वचेवर पडत आहे जे अत्यंत धोकादायक आहे. बदलत असलेली लाइफस्टाइल, चुकीचा आहार, ताण यामुळे लोकं वयापूर्वीच म्हातारे दिसू लागतात. चेहर्‍याची रंगत हिरावण्याव्यतिरिक्त सुरकुत्या येणे अगदी सामान्य असतं. या सर्वांमागे आपल्याच काही सवयी जवाबदार ठरतात. तर जाणून घ्या त्या सवयींबद्दल ज्यामुळे आपण वयापूर्वीच वयस्कर दिसताय...
 
अधिक गोड खाणे
आपल्या गोड पदार्थ खाण्याचे शौकिन असाल तर जरा सांभाळून. आपला हा शौक आपल्याला वेळेपूर्वीच वयस्कर करू शकतं. अधिक प्रमाणात गोड खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, पिंपल्स आणि सुरकुत्या या प्रकाराच्या समस्या उद्भवतात.
 
सनस्क्रीन लोशन न लावणे
उन्हाळा असो वा हिवाळा घरातून बाहेर पडताना त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावणे विसरू नये. जर आपण सतत उन्हाला सामोरा जाणार्‍यांनी सनस्क्रीन वापरले नाही तर त्वचेवर वाढत्या वयाचे परिणाम दिसून येतात.
 
उशीवर चेहर्‍या दाबून झोपणे
जे लोकं उलट किंवा पोटाच्या बाजूने झोपतात त्यांच्या चेहर्‍यावर वयापूर्वीच सुरकुत्या येऊ लागतात. पोटावर झोपल्याने चेहरा उशीवर असल्याने उशीवरील कीटाणू, मृत त्वचा, धूळ चेहर्‍यावर लागतं. म्हणून असे झोपणे टाळावे.
 
कमी प्रमाणात पाणी पिणे
कमी प्रमाणात पाणी पिणे हे देखील वाढत्या वयाचे लक्षण आहे. डॉक्टर देखील दिवसातून किमान तीन लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. ऑफिसमध्ये काम करताना पाण्याची बाटली नेहमी आपल्या समोर ठेवा आणि मधून-मधून पाणी पीत राहा.
 
नशा करणे
जर आपण अधिक सिगारेट किंवा दारू पीत असाल तर आपण वयापूर्वीच आजी-आजोबा दिसू लागाल. हे सर्व आरोग्यासाठी नव्हेच त्वचेसाठी देखील योग्य नाही.