शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2020 (16:09 IST)

त्वचेच्या संसर्गापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उटणे

साहित्य:
एक वाटी मसूर डाळीचे पीठ 
कच्चे तांदूळ एक चतुर्थांश कप
आठ बदाम
अर्धा कप गव्हाचा सांजा
चिमूटभर हळद
गुलाब पाणी
 
कृती व वापरण्याची पद्धत
मसूरडाळ, तांदूळ आणि बदाम बारीक वाटून त्याची पूड तया करा.
या पावडर मध्ये गव्हाची भरड आणि हळद घाला.
या मिश्रणात पाणी किंवा गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहरा, मान आणि हातावर लावा. 
वाळल्यावर पाण्याने धुवून घ्या.
आठवड्यातून एकदा ह्या उटण्याचा वापर करावा.
 
हे कसे कार्य करते ?
त्वचेच्या सौंदर्य वर्धनासाठी प्राचीन काळ पासून उटण्यांचा वापर केला जात आहे. हे त्वचेवरील घाण दूर करण्यास मदत करतं. हळदीत आढळणारे अँटिसेप्टिक गुणधर्मामुळे त्वचेचं संसर्गापासून संरक्षण होतं. बदाम त्वचेचं पोषण करून रंग उजळण्यास मदत करतं.