शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 4 जानेवारी 2020 (17:21 IST)

लग्नात फक्त आपल्या सौंदर्याची होईल चर्चा

प्रत्येकीलाच आपल्या लग्नात फक्त आणि फक्त आपल्या सौंदर्याची चर्चा केली जावी असं वाटत असतं. लग्नघटिका जवळ येऊ लागल्यावर मग प्रत्येकीच्या नात धाकधूक सुरू होते. अशावेळी पार्लर किंवा अन्य कॉस्मेटिक्सच्या फंदात न पडता हे घरगुती उपाय नक्की अवलंबून पाहा. 
 
चेहर्‍याची काळजी घेण्यासाठी मुळात रोज 6 ते 8 तास सलग झोप घ्या, यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणार नाहीत आणि तुमच्या हार्मोन्समध्ये संतुलन राखलं जाईल. त्याचप्रमाणे दिवसभरातून 12 ते 15 ग्लास पाणी प्या. यामुळे त्वचा उजळून निघेलच; शिवाय शरीरातली विषारी द्रव्यं बाहेर पडतील. व्हिटॅन्सि आणि अँटी ऑक्सिडंट्‌सचा आहारात समावेश असू द्या.
 
पपई, पेरू, किवी, कलिंगड अशी रसदार आणि सी-व्हिटॅममिनयुक्त फळं खा. यामुळे त्वचेच्या पेशींचं विघटन होणार नाही. अंघोळीच्या वेळी साबण किंवा क्लिन्सिंग मिल्कपेक्षा अधूनधून गुलाबपाणी, मध, हळद, चंदन वापरा. त्यांची पेस्ट करून ती लावल्यावर मृत पेशी निघून जातील आणि त्वचेचा निखार आणखी वाढेल.
 
घरगुती फेस पॅक वापरा. तुळशीत असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुणर्धांमुळे उन्हामुळे टॅन झालेली त्वचा तिच्या पूर्वरूपात येऊ शकते. तुळशीच्या पानांची पेस्ट आणि त्यात गुलाबपाणी, साखर आणि मध घालून ते कालवलेलं मिश्रण चेहर्‍यावर लावा.
 
10 मिनिटं हा फेसपॅक चेहर्‍यावर ठेवा. असं वारंवार केल्यानं काळवंडलेला चेहरा उजळून निघतो. तसंच, दुधात क्रश केलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि तो लेप चेहर्‍यावर 20 मिनिटांसाठी लावा. कोमट पाण्यानं चेहरा धुवा. आठवड्यातून किमान दोन वेळाहा पॅक लावल्यावर त्वचेतील कोरडेपणा निघून जातो.
 
फक्त चेहर्‍याच्या रंग, पोत यांचा विचार करत असताना अनेकदा खांदे आणि मान यांच्याकडे दुर्लक्ष होतं.  मीठ आणि लिंबू एकत्र करून खांदा आणि मान घासा. यामुळे त्वचेतील मृतपेशी निघून जातील.