Morning Skin Care Tips : सकाळी उठल्यावर थंड पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे

Last Modified बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (10:15 IST)
सकाळी सकाळी उठल्यावर आपण आपल्या चेहऱ्यावर सूज बघितली असेल. कधी कधी चेहऱ्यावर बारीक पुळ्या पण येतात. जास्त ताण, झोप पुरेशी न होणं किंवा एखाद्या वस्तूंची ऍलर्जी असल्यास बारीक पुळ्या किंवा पुरळ येतात. पण एक सोपी टिप्स अवलंबवून आपण त्वचेशी निगडित समस्यांपासून आराम मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत त्यात.

सकाळी- सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवावा. कोणतेही साबण, फेसवॉश न वापरता केवळ पाण्याने चेहरा धुवावा. तर आपल्या चेहऱ्यावर हळू-हळू तेज येऊ लागतो. असे आपण नियमित करावं. थोड्याच दिवसात आपणास फरक जाणवू लागेल. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला अनेक फायदे होतात.

* आपल्या सर्वांना हे ठाऊकच आहे की चेहऱ्यावर आईस क्यूब चोळणे फायदेशीर मानले जाते. त्याच प्रमाणे थंड पाण्याने चेहरा धुणं आपल्याला उत्साही करतं. असे केल्याने त्वचा घट्ट आणि टवटवीत राहते. आपली त्वचा तरुण राहते. आपण थंड पाण्याने चेहरा धुवत असाल, तर चेहऱ्याचा बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात.
* चेहरा सकाळी थंड पाण्याने धुतल्याने त्वचा तजेल होते आणि ज्यामुळे रक्त प्रवाह तीव्र होतो आणि चेहऱ्यावर चकाकी येते.

* जर आपण स्टीम किंवा वाफ घेता, तर त्यानंतर आपल्या चेहऱ्याला थंड पाण्याने आवर्जून धुवावे. असे केल्याने रोमछिद्र बंद होतात.

* जर आपल्या त्वचेला सन बर्नचा त्रास होत असल्यास, दररोज सकाळी-सकाळी आपल्या चेहऱ्याला थंड पाण्याने धुवावे. शक्य असल्यास दिवसातून एक ते दोन वेळा आवर्जून करावं. असे केल्यास आपल्याला सूर्य किरणांच्या हानिकारक प्रभावापासून मुक्ती मिळेल आणि त्याच बरोबर आपल्या चेहऱ्यावर टवटवीत पणा येईल.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

Immune System मजबूत करतं तुळशीचा चहा

Immune System मजबूत करतं तुळशीचा चहा
सर्वप्रथम 2 कप पाणी एका पातेलीत घालून उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यावर पातळी गॅस वरून ...

Canara Bank SO Recruitment 2020 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी ...

Canara Bank SO Recruitment 2020 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी भरती सुरू
कॅनरा बँकेने विशेषज्ञ अधिकाऱ्यांच्या पदासाठी रिक्त जागा काढली आहेत. पदवीधरांना बँकेत ...

Fashion Tips: लेगिंग्ज घालण्याची योग्य पद्धत माहित आहे का? ...

Fashion Tips: लेगिंग्ज घालण्याची योग्य पद्धत माहित आहे का? जाणून घ्या
जेव्हा जेव्हा आपल्या सोयीच्या कपड्यांची गोष्ट केली जाते तेव्हा आपण लेगिंग्जचा विचार करतो. ...

डॉक्टर बनण्यासाठी आवश्यक आहे नीटची परीक्षा, अशी करा तयारी

डॉक्टर बनण्यासाठी आवश्यक आहे नीटची परीक्षा, अशी करा तयारी
नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रेंस टेस्ट. ही परीक्षा देशभरातील वैद्यकीय ...

थंडीत फॅशनेबल राहताना...

थंडीत फॅशनेबल राहताना...
थंडीत स्टायलिंगसोबतच शरीराला ऊबही मिळायला हवी. म्हणूनच या दिवसात प्लेड कोट आणि पश्मिना ...