बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (13:18 IST)

कोरोना काळात ब्युटी पार्लरला जात असाल तर या 10 गोष्टी लक्षात ठेवा

कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी सावधगिरी आणि चौकस राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोव्हिड -19 च्या धोक्याला लक्षात घेऊन लोकं आपल्या नित्यक्रमात बदल करीत आहे. घरातून बाहेर पडताना अश्या सर्व गोष्टींची काळजी घेत आहे जे त्यांना या संसर्गापासून सुरक्षित ठेवू शकतात. तसेच लॉकडाउन नंतरचे आयुष्य हळू हळू परत सुरळीत होण्याचा मार्गावर आहे. बाजारपेठ, मॉल्स आणि सलून उघडले आहेत. पण या सर्व वर्दळीच्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
 
जर आपण ब्यूटीपार्लर जाण्याचा विचार करीत असाल तर काळजी देखील घ्या. 
 
पार्लर जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, चला जाणून घेऊया. 
 
* ब्युटी पार्लरला जाण्याच्या पूर्वी खात्री करा, की आपण मास्क लावला आहे आणि आपल्याकडे सेनेटाईझर आहे.
 
 
1 ब्युटी पार्लर मध्ये मास्कचा वापर करावा आणि ह्याला आपल्या तोंडावरून काढू नका.
 
2 ग्लव्ज चा वापर करावा.
 
3 पार्लरमधील वस्तूंना हात लावू नका. आणि जर का स्पर्श जरी केला गेला असेल तर त्वरित हाताला सेनेटाईझ करा.
 
4 सलूनमध्ये जाताना या गोष्टींची खात्री बाळगा की पार्लरच्या कामगारांनी फेस शील्ड लावला आहे. 
 
5 सलून मध्ये कामगारांनी मास्क आणि ग्लव्ज घातले आहे, याची खात्री बाळगा.
 
6 केस कापण्याचा वेळी पार्लरच्या कामगारांनी ज्या कापड्याचा वापर केला आहे, त्याचा वापर फक्त एकदाच करावा, याची काळजी घ्या.
 
7 सलून आणि ब्यूटीपार्लर मध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांना फेस शील्ड घालणे, आणि त्याच बरोबर मास्क आणि ग्लव्ज घालणे देखील अनिवार्य आहे. 
 
8 पार्लरच्या कामगारांनी देखील काळजी घ्यावी की कापड्याच्या जागी डिस्पोझेबल कापड किंवा इतर साहित्य वापरावं.
 
9 पार्लर मध्ये जास्त वर्दळ नसल्यास जावं.
 
10 पार्लरमध्ये असलेल्या लोकांपासून योग्य अंतर राखावं.