गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (17:17 IST)

Baby Soft Skin मिळवण्यासाठी खास टिप्स

लहान मुलांसारखी नरम त्वचा मिळवण्यासाठी व्हिटॅमिन- ई ऑयल आपल्यासाठी जादूप्रमाणे काम करेल. कारण यात अनेक प्रकाराचे अॅटी- ऑक्सीडेंट गुण असतात. हे वापरल्याने त्वचा आणि केसासंबंधी अनेक समस्या सुटतात. याने त्वचेवरील डेड स्किन स्वच्छ होते. तर जाणून घ्या कसे वापरायचे हे तेल-
 
आपण आपल्या डे किंवा नाइट क्रीममध्ये 2-3 व्हिटॅमिन- ई कॅप्सूलहून तेल काढून मिसळून लावू शकता. याने डेड स्किन स्वच्छ होण्यास मदत ‍मिळेल. आपण हे आपल्या चेहरा आणि बॉडीवर अप्लाय करू शकता. 
 
चेहर्‍यावरी तारुण्य टिकवण्यासाठी आपण व्हिटॅमिन- ई ऑयल सीरम प्रमाणे वापरू शकता. यासाठी आपल्याला तेल आपल्या हातावर घेऊन मसाज कर लावावे. याला रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. याने त्वचेला पोषण मिळतं. आणि सुरकुत्या पडत नाही.
 
ड्राय ओठांवर व्हिटॅमिन- ई ऑयल जादूचं काम करेल. यासाठी तेलाचे काही थेंब लिप बाममध्ये मिसळून ओठांवर लावावं.
 
आपण चेहर्‍याव्यतिरिक्त हाताचे कोपर आणि गुडघ्यावर हे तेल लावून मालीश करू शकता ज्याने तेथील ड्रायनेस आणि काळपटपणा दूर होण्यास मदत मिळेल आणि त्वचा नरम पडेल. आपण आपल्या नखांवर देखील हे तेल लावू शकता.
 
सन टॅनिगमुळे काळपण आणि रुक्ष झालेल्या त्वचेसाठी एक चमचा दह्यात 2-3 व्हिटॅमिन- ई कॅप्सूलचं तेल मिसळून प्रभावित स्किनवर लावल्याने राहत मिळते. 
 
या व्यतिरिक्त आपण लिंबाच्या रसात हे तेल मिसळून देखील वापरू शकता. चांगले परिणाम हाती येतील.