शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (11:11 IST)

नारळाचे तेल फक्त केसांसाठी नव्हे, एकदा हे देखील करून बघा...

सामान्यपणे नारळाचे तेल केसांसाठी उपयुक्त मानले जाते, पण काय आपणांस ठाऊक आहे की या तेलाचे बरेच गुणकारी उपयुक्त उपयोग आहे. चला तर मग जाणून घेऊ या....
 
* कोरड्या आणि फाटलेल्या ओठांवर सकाळ संध्याकाळ नारळाचे तेल लावावं. कोरडेपणाची समस्या नाहीशी होते.
 
* टाचेला भेगा पडल्या असल्यास रात्री झोपण्याच्या पूर्वी पेट्रोलियम जेली सोबत नारळाच्या तेलाची मॉलिश करावी. सकाळी कोमट पाण्याने पाय धुवावे.
 
* डागांची समस्यांनी त्रस्त असल्यास अर्धा चमचा नारळाच्या तेलामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून चेहऱ्यावर आणि कोपऱ्यावर चोळा, नंतर कोमट पाण्याने धुऊन घ्या.
 
* डोळ्यांचा मेकअप स्वच्छ करण्यासाठी कॉटन बॉलवर थोडंसं नारळाचं तेल टाकून हळुवार हाताने डोळ्यांना स्वच्छ करावं.
 
* नारळाच्या तेलाची अंघोळीच्या पूर्वी किंवा अंघोळ केल्यावर मॉलिश करावी. या मुळे त्वचा मऊ आणि तजेल राहते.
 
* अंगावर कोणत्याही प्रकारची खाज येत असल्यास नारळाच्या तेलात कापूर मिसळून त्वचेवर लावा आणि फायदा स्वतः बघा.