सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (16:19 IST)

देशात कर संबंधित नवीन व्यासपीठ सुरू होणार, उद्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी कर संबंधित नवीन व्यासपीठ सुरू करणार आहेत. यामुळे करांच्या बाबतीत पारदर्शकता वाढेल आणि प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन मिळेल असा दावा केला जात आहे. उद्या सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान ‘ट्रान्सपरंट टॅक्सेशन: ऑनरिंग द ऑनेस्ट’ या व्यासपीठाचा शुभारंभ करणार आहेत. या व्यासपीठाच्या माध्यमातून १५ ऑगस्टपूर्वी प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहित करण्याची प्रणाली देशात सुरू होईल. गुरुवारी पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्राप्तिकरचे सर्व प्रधान मुख्य आयुक्त आणि मुख्य आयुक्त सामील होतील.
 
गेल्या ३-४ आठवड्यांत पंतप्रधान कार्यालयाने देशातील कर अधिकाऱ्यांसमवेत मूल्यांकन आणि पारदर्शकता इत्यादी विषयांवर बैठका घेत चर्चा केली. फेसलेस मूल्यांकन आणि इतर निर्णयांमुळे करदात्यांचा त्रास कमी होईल आणि कर प्रणाली सुलभ होईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच म्हटलं होतं. देशातील अनेक संस्था आयकर प्रणाली रद्द करण्याची किंवा प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहित करण्याची मागणी करत आहेत. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी आयकर रद्द करण्याची मागणी करत आहेत.