शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (10:26 IST)

कोरोनाबळींचा देशातील आतापर्यंतचा उच्चांक

देशात गेल्या २४ तासांत ६२ हजार रुग्णांची भर पडली असून, १,००७ मृत्यूंची नोंद झाली. एका दिवसातील कोरोनाबळींचा देशातील आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. कोरोना रुग्णांची देशातील एकूण संख्या २२ लाख १५ हजार ७४ वर पोहोचली आहे.

देशातील कोरोनाबळींची संख्या ४४ हजार ३८६ झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक ५४ हजार ८५९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १५ लाख ३५ हजार ७४३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले आहे.