शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 5 जुलै 2020 (07:24 IST)

कशाला हवं जिंक आणि आपल्याला कुठून मिळणार

जिंक एक असे खनिज आहे जे शरीराची जिवाणू आणि विषाणूंशी लढण्यात मदत करत. जिंक हे डीएनए बनविण्यासाठी आवश्यक असत. डीएनए शरीराला सूचना देतं की त्याला कसं काम करावयाचे आहे. चला जाणून घेऊया की जिंक आपल्याला कश्या प्रकारे दर रोजच्या जेवणातून किंवा सप्लिमेंटमधून मिळू शकतं. 
 
जिंक निव्वळ शरीराच्या जखमा भरण्यासाठीच नव्हे तर स्वाद आणि वास घेण्याच्या शक्तीला वाढवतं. हे लहान आणि वाढत्या मुलांच्या शारीरिक वाढीसाठी आवश्यक असतं. 
नेत्र रोगामध्ये फायदेशीर डोळ्यांमध्ये वय सरता सरता एक आजार होतो ज्याला मॅक्युलर डिजनरेशन म्हणतात. या मध्ये काही ठराविक काळानंतर डोळ्याची दृष्टी नाहीशी होते. याच कारणामुळे काही 
 
नेत्ररोग तज्ज्ञ रुग्णांना दररोज असे मल्टी व्हिटॅमिन खाण्याचा सल्ला देतात ज्यामध्ये जिंकच्या बरोबर व्हिटॅमिन ए आणि सी असायला हवं. पालक, कांदा, ब्रेडक्रम्ब्स आणि पर्मेजन चीज मध्ये जिंक पुरेसं आढळतं. काजू मध्ये देखील जिंक भरपूर प्रमाणात आढळतं. 
 
दररोज किती जिंक हवं 
एका वयस्कर पुरुषाला 11 मिलिग्रॅम जिंक आणि वयस्कर स्त्रीला 8 मिलिग्रॅम जिंक दररोज हवं असतं. जर स्त्री बाळाला दूध पाजत असल्यास तिला 12 मिलिग्रॅम जिंक गरजेचं आहे. मुलांना त्यांचा वय आणि लिंगानुसार जिंक गरजेचे आहे. 
 
किती जिंक पुरेसं आहे 
जर का आपण मांसाहारी आहात तर आपल्याला जिंक पुरेसं मिळत आहे पण शाकाहारी असणाऱ्यांना पर्याप्त जिंक मिळत नसतं. या व्यतिरिक्त आपल्या पोटाची शल्यक्रिया झाली असल्यास, मद्यपानाची सवय असल्यास किंवा पोटाच्या अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखे काही आजार झाले असल्यास शरीराला जिंक पचवायला आणि वापर करण्यास जड जातं. 
 
जिंकचे कमी प्रमाणाचा परिणाम
मुलांच्या वाढीसाठी जिंक आवश्यक आहे. जर जिंक कमी मिळालं तर मुलांची वाढ मंदावेल. त्यांना किशोरावस्थत जाण्यास बराच काळ लागणार. ज्या वयस्करांच्या शरीरात जिंकची कमतरता असते त्यांचे केसं खूप गळतात, त्यांना पुन्हा पुन्हा अतिसाराचा त्रास होतो. डोळ्या आणि त्वचेत पुरळ होतात, भूक लागत नाही. ह्याचा कमतरतेमुळे लैंगिक दुर्बळता येते. 
 
चकाकती त्वचा 
शरीराला जिंक पुरेसं मिळाल्यामुळे त्वचा शरीरास उन्हाळा, हिवाळा, जिवाणू आणि विषाणूं पासून वाचवते. जर का कोणाला मुरूम झाले असल्यास त्याला जिंक पुरेसे घ्यायला हवं. एखाद्या त्वचारोग तज्ज्ञांकडून जिंक पर्यायायुक्त ऑइटमेन्ट किंवा क्रीम देखील लिहून घेऊ शकता. 
 
सर्दीवर प्रभावी
काही संशोधनानुसार जेव्हा आपण जिंकच्या चोखण्याचा गोळ्या किंवा सायरप घेता तर 24 तासातच आपल्या सर्दीच्या लक्षणांमध्ये सुधारणा होते. नेजल स्प्रे आणि जेल मध्ये देखील जिंक मिसळतात. याचा संबंध वासाच्या क्षमतेशी असतो. 
 
सप्लिमेंट्स 
जिंक खाद्य पदार्थांच्या व्यतिरिक्त देखील सप्लिमेंट किंवा पर्याय म्हणून घेता येतं. कोणत्याही मल्टी व्हिटॅमिन मध्ये जिंकचा समावेश असतो. आहारात जिंक मिळत नसल्यास सप्लिमेंट किंवा त्याचा पर्याय घ्यायला हवं. या साठी आहार तज्ज्ञ किंवा चिकित्सकाशी सल्ला घ्यावा. 
 
जिंकची जास्त प्रमाणात घेतल्याने डोकंदुखी, अतिसार, पोटात मुरड किंवा मळमळ सारखे त्रास होऊ शकतात. जास्त काळापर्यंत जिंक घेऊ नये आणि शरीरामध्ये कॉपर नावाचे खनिज कमी असल्यास रुग्णाची रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते.